धनंजय काशिनाथ मदन - लेख सूची

स्टोन्स इन्टू स्कूल्स

नुकतंच ‘स्टोन्स इन्टू स्कूल्स’ (लेखक ग्रेग मॉर्टेन्सन, अनुवाद – सुनीति काणे) हे पुस्तक वाचून झालं. ग्रेग हा अमेरिकन गिर्यारोहक. तो काराकोरम पर्वतराजीतल्या K2 या जगातील दुसऱ्या सर्वोच्च (एव्हरेस्ट नंतर) शिखराच्या मोहिमेवर एकटाच गेलेला असतो. वातावरण खूप खराब झाल्यामुळे परतताना White-out झाल्याने तो वाट हरवून बसतो व काही दिवसांनी कोर्फे या पाकिस्तानातील एका भलत्याच गावात पोहोचतो. …

काही कविता

(१) येणारा काळ कठीण असेल चक्रमांची पैदास जाणूनबुजून केली जातेयएक एक मेंढरू, कळपात सापळा लावून ओढलं जातंयटाळ्या वाजवायच्या हाळ्या देऊनउपकाराची फेड केली जातेय,हात टाळ्यांत गुंतल्याने, करायचे काम बाजूला पडतंय. दिवे लावा, दिवे मालवा म्हणतदेशाला जागं केलं जातंयअंधाराची अफू देऊन प्रकाशाला दूर पळवलं जातंय कित्येक अडकलेले, दूर कोठे घरापासूनआपली माणसं, आपलं गावपाहिलं नाही डोळे भरून. अशांचा काही विचार हवाभरीव रोकडे धोरण आखा. …